म्यानमारमध्ये सशस्त्र हल्ल्यात १२ ठार ,देशभरात इंटरनेट सेवा बंद


विशेष प्रतिनिधी

यंगून : आँग स्यान स्यू की यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारविरोधात बंड पुकारून लष्कराने उठाव केल्यापासून म्यानमारमध्ये अराजकता पसरलेली आहे. आता हिंसक घटनाही घडू लागल्या आहेत.12 killed in Myanmar armed attack internet service shut down across the country

म्यानमारमधील स्वप्रशासित क्षेत्राच्या माजी सत्ताधिकाऱ्यांच्या समितीतील प्रमुख सदस्याच्या ताफाऱ्यावर शनिवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्यात नऊ नागरिक आणि तीन पोलिसांसह बारा जणांचा मृत्यू झाला.दरम्यान, लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर देशभरातील इंटरनेट सेवा शनिवारपासून बंद करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचा दावा करीत लष्कराने आज ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रॅमवर बंदी घातली. देशात इंटरनेट खंडित करण्याची ही आठवडाभरातील दुसरी आहे.

म्यानमारमधील इंटरसेवेचे नियंत्रण करणारी ‘नेटब्लॉक्स’ने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून ही बंदी अमलात आली. यामुळे कनेक्टिव्हिटी मिळण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा ५४ टक्क्यांनी घटले आहे. ऑनलाइन संपर्कात अनेक अडथळे येत आहेत.

12 killed in Myanmar armed attack internet service shut down across the country

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती