11 ऑडिओ क्लिप ; मतदारसंघातली लेकीसाठी पंकजा ताई आक्रमक ; तिच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे

या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स आहेत. 


विशेष प्रतिनिधी 

पुणे : 22 वर्षाच्या पुजा चव्हाणने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .तीने शिवसेनेच्या एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे . मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक आत्महत्या का केली अद्याप स्पष्ट झालेले नाही.11 audio clips; Pankaja Tai aggressive for Leki in constituency; Her death must be investigated

तरुणीच्या आत्महत्येनंतर तिचे विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले होते. अशातच आता भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.


बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी, ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करा!


 

11 audio clips; Pankaja Tai aggressive for Leki in constituency; Her death must be investigated

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकीय वादात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रामक झाल्या आहेत , “पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*