दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन, शिक्षणमंत्र्यांची घोषणा; पालक, विद्यार्थी यांच्यातील संभ्रम अखेर दूर

वृत्तसंस्था

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा ऑनलाइन की ऑफलाईन घेणार यावरून उलटसुलट विधानांना पूर्णविराम मिळाला आहे. 10th and 12th exams offline, Minister of Education’s announcement; The confusion between parents and students is finally gone

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21मे 2021 या कालावधीत होणार आहे.कोरोना संसर्गामुळे दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं आहे. त्यामुळे त्या कशापद्धतीने होणार? याबद्दल पालकांच्या मनात शंका होत्या. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

10th and 12th exams offline, Minister of Education’s announcement; The confusion between parents and students is finally gone

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*