१० लाख महिलांना सोलर चरखे देणार; सूतकताईतून महिन्याची कमाई २० हजार रूपये


  •  महिलांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा

वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. परिणामी अनलॉक पूर्णत: करण्यात आला नसून अंशत: विविध आस्थापने खुली करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महिला रोजगाराची मोठी घोषणा केली आहे. १० लाख महिलांना सोलर चरखे देऊन त्यातून निघणारे सूत सरकार खरेदी करेल आणि महिलांना किमान २० हजार रूपये महिना कमाई होऊ शकते, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

कोरोनानंतर आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान समाजातील वागणूक यासह कामामध्येही मोठा बदल घडू शकतो. कोरोनाच्या काळात अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू त्या खुल्या होत आहेत. मात्र अनेक कंपन्यांनी वेतनकपातीसह अनेक कामगारांना कामावरुन कमी केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरातून लघुउद्योग आदी सुरू करण्याची गरज निर्माण होणार आहे.

10 लाख महिलाओं को हम सोलर चरखा देने वाले हैं। इस सोलर चरखे पर 4 घंटे रोजाना काम करके एक महिला हर महीने 20हज़ार तक कमा सकती है। ये सूत हमारा मंत्रालय खरीदेगा – नितिन गडकरी 

तर दुसरीकडे एमएसएमईमध्ये मोठा बदल होऊ शकतो. राज्याचे MSME मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. यावेळी गडकरी म्हणाले, “१० लाख महिलांना आम्ही सोलर चरखे देणार आहोत. या सोलर चरख्यावर दररोज ४ तास काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याला महिलेला २० हजार रूपयांपर्यंत रोजगार मिळू शकतो. हे सूत आमचे मंत्रालय खरेदी करेल. यामुळे महिलांच्या हाताला कामही मिळेल आणि कोरोनाच्या संकटात घर चालविण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागेल.” देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही घोषणा अनेक कुटुंबासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून त्यांना घरबसल्या कमावणे शक्य होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था