सिरमचा १ डोस २०० रूपयांना, तर भारत बायोटेकचा १ डोस २९५ रूपयांना केंद्र सरकार खरेदी करणार; दोन्ही संस्थांना ऑर्डर दिली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस संशोधन आणि उत्पादन संस्थांचे कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असून सिरमचे १ कोटी १० लाख डोस प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे तर भारत बायोटेकचे ३८.५ लाख डोस प्रत्येकी २९५ रूपयांप्रमाणे खरेदी करणार आहे. 1 dose of serum for Rs 200, 1 dose of Bharat Biotech for Rs 295

पण भारत बायोटेक १६.५ लाख डोस भारत सरकारला मोफत देणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.


कोरोना लस देताना वशिलेबाजी नको; राजकारण्यांनाही प्राधान्य देऊ नका! मोदी यांचे आदेश


इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या लसी स्वीकारून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हायचा निर्णय घेतल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

1 dose of serum for Rs 200, 1 dose of Bharat Biotech for Rs 295

कोरोना प्रतिबंधक लसीच्या किमतीवरून बरेच तर्क – वितर्क लढविले गेले होते. लसीकरणाचा खर्च कोणी करायचा, तसेच सरकारी दवाखाने, हॉस्पिटल आणि खासगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये लस किती किमतीला पडणार याची चर्चा देशभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी वरील खुलासा केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती