indian Railway : स्वस्त आणि मस्त – पहिला वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत ; पियूष गोयल यांची माहिती

हे एलएचबी इकॉनॉमी क्लासचे डबे आवश्यक मंजुरीनंतर एलएचबी कोचसह चालणार्‍या सर्व मेल / एक्स्प्रेस गाड्यांमध्ये (राजधानी, शताब्दी, दुरंतो आणि जन शताब्दी वगैरे विशेष गाड्या वगळता ) समाविष्ट केले जातील. first air-conditioned three tier economy class coach in service by Indian Railway


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : पंजाबमधील कपूरथला इथल्या रेल्वे कोच फॅक्टरीने अलिकडेच पहिला प्रोटोटाइप लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा डबा सादर केला आहे. याची चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वत: याबाबत माहिती दिली होती.भारतीय रेल्वेचा हा नवा कोच सर्वात स्वस्त आणि वातानुकूलित यात्रेसाठी चांगला पर्याय असल्याचं भारतीय रेल्वेकडून सांगितलं जात आहे. हा कोच किफायतशीर आणि सध्याच्या Non AC स्लीपर क्लास कोच आणि AC थ्री टियर कोचच्या मध्ये असणार आहे.

कपूरथला इथल्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनाझेशन लखनऊमध्ये करण्यात आलं आहे. या कोचची कल्पना RCF कडून करण्यात आली होती आणि ऑक्टोबर 2020 मध्ये या कोचची डिझाईन सुरु झालं होतं.

एलएचबी एसी थ्री-टियर कोचची वैशिष्ट्ये

 • पॅसेंजर डेकवर सुटसुटीत इलेक्ट्रिकल पॅनेल्समुळे प्रवाशांना वापरासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध
 • 83 बर्थमुळे प्रवासी क्षमता वाढली.
 • दिव्यांगजनांना व्हीलचेयरवरून प्रवेश करता येईल असे सक्षम प्रवेशद्वार व डब्यांची रचना तसेच सुगम्य भारत अभियानाच्या निकषांचे पालन करून व्हीलचेयर प्रवेशासह दिव्यांगजन -स्नेही शौचालयाची तरतूद.
 • सर्व बर्थसाठी स्वतंत्र वातानुकूलन फटीच्या माध्यमातून एसी डक्टिंग.
 • आरामदायी, कमी वजन आणि उच्च देखभाल योग्य सीट आणि बर्थचे मॉड्यूलर डिझाइन.
 • लॉंजिट्यूडिनल आणि ट्रान्सव्हर्स बे अशा दोन्ही मध्ये फोल्डेबल स्नॅक टेबल्सच्या स्वरूपात सुधारित प्रवासी सुविधा, इजामुक्त जागा आणि पाण्याच्या बाटल्या, मोबाइल फोन आणि मासिके ठेवण्यासाठी होल्डर्स
 • प्रत्येक बर्थसाठी वाचनासाठी वैयक्तिक दिवे आणि मोबाइल चार्जिंग पॉईंट्स.
 • मधल्या आणि वरच्या बर्थवर प्रवेश करण्यासाठी शिडीची अर्गोनॉमिकली सुधारित रचना.
 • भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या प्रसाधनगृहांची सुधारित रचना .
 • नेटके आणि कार्यक्षम प्रवेशद्वार
 • लुकलुकणाऱ्या बर्थ क्रमांक आणि नाईट लाइटसह बर्थ इंडिकेटर.
 • जागतिक निकषांची पूर्तता करुन सुधारित अग्निसुरक्षा मानक

रेल्वे, वाणिज्य व उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

first air-conditioned three tier economy class coach in service by Indian Railway

 

 

 

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*