काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यापासून सुरक्षा दलांनी केलेल्या कारवायांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर मसूद याला सुरक्षा दलाने टिपल्याने जम्मू विभागातील डोडा जिल्हा पुन्हा एकदा अतिरेकी मुक्त झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यापासून सुरक्षा दलांनी केलेल्या कारवायांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर मसूद याला सुरक्षा दलाने टिपल्याने जम्मू विभागातील डोडा जिल्हा पुन्हा एकदा अतिरेकी मुक्त झाला आहे.
अनंतनाग जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्य आणि पोलिसांना सातत्याने यश मिळत आहे. अनंतनाग जिल्ह्यातील खुलचोहर भागात सुरक्षा दलाने 3 अतिरेकी ठार केले. त्यामध्ये मसूदचा समावेश आहे.
मसूद हा डोडा जिल्ह्यातील शेवटचा दहशतवादी होता. तो डोडा येथील एका बलात्काराच्या प्रकरणात सहभागी होता. त्या घटनेनंतर तो फरार झाला होता. नंतर हिजबुल मुजाहिद्दीनसोबत सामील झाला आणि काश्मीरमधून दहशतवादी कारवाया करण्यास सुरूवात केली.
खुलचोहर चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची एके 47 रायफल आणि 2 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री 11 वाजता सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. सोमवारी पहाटे चार वाजता चकमक सुरू झाली.