हाथरस प्रकरणावरून जातीय दंगल भडकाविण्याचा प्रयत्न, उत्तर प्रदेश पोलीसांचा दावा

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावरून जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक वेबसाईटही बनविण्यात आली होती, असे उत्तर प्रदेश पोलीसांतर्फे सांगण्यात आले आहे.


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कथित सामुहीक बलात्कार प्रकरणावरून जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक वेबसाईटही बनविण्यात आली होती, असे उत्तर प्रदेश पोलीसांतर्फे सांगण्यात आले आहे.

हाथरस येथे वाल्मिकी समाजाच्या एका युवतीचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या युवतीवर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याचा आरोप केला होता. मात्र, उत्तर प्रदेशतील पोलीसांनीही आता हा कट असल्याचे म्हटले आहे. हाथरसमधील कथित बलात्काराच्या घटनेविरोधात हिंसक निदर्शने करण्याची तयारी सुरू होती, असा दावा पोलीसांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत कुमार याबाबत म्हणाले, सर्वकाही आता सांगणे योग्य नाही. या प्रकरणी माहिती गोळा केली जात आहे. यानंतर यासंदर्भात माहिती देण्यात येईल. जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम ही वेबसाइटच्या मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी तयार करण्यात आली. बनावट आयडीच्या माध्यमातून अनेक जण या वेबसाइटशी जोडले गेले होते. या साइटवर दंगली भडकवण्यापासून ते कायदेशीर उपाययोजना करण्याची माहितीही देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर चुकीचे फोटो पोस्ट करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठी निधीही दिला जात आहे. जगभरात विविध आंदोलनांसाठी पेज तयार केले जात आहे. तसेच पेज या प्रकरणासाठी तयार गेलं होतं. हे पेज आता डिलिट करण्यात आलं आहे. या वेबसाइटच्या मागे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या पीएफआय आणि एसडीपीआय या संघटनांचा हात असल्याचा संशय देखील आहे, असे पोलीसांनी म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*