हवाच कशाला जादा युरिया?; मोजकाच वापरा; राज्याच्या कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला


विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाआघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत असल्याचा प्रत्यय आता राज्यातील नागरीकांना येऊ लागला आहे. शेतीच्या संदर्भात बोलायचे झाले तर शेतकऱ्यांना खतपुरवठा पुरेसा प्रमाणात होतांना दिसत नाही. किंबहुना राज्यभर बोंबाबोंब सुरू आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे.

काही भागातील परिस्थितीत एकदम विचित्र असून हा शेतकरी राजाच अडचणीत आलेला असताना ठाकरे – पवार सरकारमधील कृषीमंत्री दादा भुसे यांनी युरीया खते मिळत नसतील तर ती जपून वापरा असा अजब सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांना पुरेशी खते देण्याची जबाबदारी सरकारवर असताना कृषीमंत्री सल्लागारीत मग्न आहेत.

शेतकऱ्यांनी आता खते किती आणि कशी वापरायची हे सांगण्याची वेळ सरकारवर आली आहे. महाआघाडीचे कॅप्टन असलेल्या उद्धव ठाकरे सरकारच्या कामकाजाबद्दल कुणी बोलायलाच नको. अंधेर नगरी चौपट राजा अशी काहीशी स्थिती आरोग्य, शिक्षणच नव्हे तर आता शेतीसह इतर क्षेत्रांमध्येही दिसून येत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकला पालकमंत्री भुजबळांच्या जोडीला शिवसेनेचे निष्ठांवान म्हणून परिचित असलेल्या दादा भुसे यांना कृषीमंत्री पद लाभले. या मंत्रीमहोद्यांचा मालेगाव हा मतदारसंघ तर बागलाण हा त्यांच्या लगतचा परिसर आहे. मालेगावसह आजूबाजूच्या परिसात शेतकरी युरिया खत मिळविण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आहे मात्र त्यांना काही खते मिळत नाहीत. सगळीकडेच ही ओरड आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कृषीमंत्र्यांनी बागलाण, सटाणा भागाचा दौरा केला.

त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेतले खरे आणि निघताना सूचना केली. तुम्ही जेवढा गरजेचा आहे. तेवढाच युरीया वापरा. उगीचच जास्त वापर करू नका. त्यामुळे इतरांना तुटवडा जाणवतो, असा सल्ला दिला. यावरून स्थानिक भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाच पण सोशल मीडियावरूनही कृषीमंत्र्यांवर खतांएेवजी सल्ला दिल्याबद्दल टीका होत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था