‘स्वाभिमानी’तील राजू शेट्टी विरोधक मादनाईक, जालंदर पाटील “नॉट रिचेबल


  • शरद पवार पुरस्कृत आमदारकीचा वाद शमण्याची चिन्हे नाहीत

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या शरद पवार पुरस्कृत विधान परिषद आमदारकीवरून वाद सुरू असताना शेट्टींना विरोध करणारे दोन सहकारी सावकार मादनाईक आणि प्रा. जालंदर पाटील हे दोन्ही नेते “नॉट रिचेबल” झाले आहेत.

राजू शेट्टी यांनी आमदारकीची ऑफर स्वीकारायची की याचा निर्णय ते स्वत: घेणार नाहीत. पक्षाची कोअर कमिटी घेणार आहे, हे काल रात्री जाहीर करण्यात आले. या कमिटीच्या निर्णयाआडून शेट्टीच आमदारकी स्वीकारण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मादनाईक आणि जालंदर पाटील “नॉट रिचेबल” झाले.

राजू शेट्टी यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन आमदारकीची ऑफर स्वीकारल्याबद्दल सावकार मादनाईक यांनी काल शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेनंतर शेट्टी यांनी ‘विधानपरिषदेमुळे जर जवळची माणस दूर जात असतील तर ही ब्याद नको” अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सावकार मादनाईक आणि शेट्टी यांचे दुसरे नाराज सहकारी प्रा. जालंधर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर दोघेही ‘नॉट रीचेबल’ आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषद जागा देण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला होता. ही चर्चा लोकसभा निवडणुकीच्या अगोदरची होती. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही पक्षाला शिरोळ मध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सगळी राजकीय गणिते बिघडली. याचदरम्यान शेट्टी यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदवर संधी मिळावी अशी मागणी सुरू झाली. त्याचवेळी जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक यांनीही विधान परिषदेची आमदारकी मिळावी, अशी मागणी केली होती.

दोन दिवसांपूर्वी स्वतः शेट्टी यांनीच विधानपरिषद ऑफर स्वीकारल्याने दोघेही नाराज झाले असल्याची माहिती मादनाईक यांनी काल दिली होती. “आम्हा दोघांपैकी एकाला आमदार करा” असे ते म्हणाले होते. त्यांनी काल शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देत शेट्टी यांनी, “आमदारकीसाठी जर जवळची लोक दूर जात असतील तर ती ब्याद नको.”असे म्हणत विधानपरिषद स्वीकारण्यास नकार दिला. भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली. पण दोनच तासात ते फिरले. कोअर कमिटीच्या बैठकीची बातमी चालवली. या घडामोडींनंतर सावकार मादनाईक आणि जालंदर पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते “नॉट रिचेबल” आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती