सेनापती तात्या टोपेंच्या येवल्यातील स्मारकाची जागा बदलण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली


अडीच कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यानंतर हस्तक्षेप अयोग्य; उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाच्या उभारणीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही शेतजमीन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली.

सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे यांनी तात्या टोपेंच्या स्मारकाची जागा बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. नाशिकमधील येवला नगर परिषदेने स्वातंत्र्य लढ्यातील सेनापती तात्या टोपे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या स्मारकाची जागा बदलण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही शेतजमीनीचा भाग असल्याने ते स्मारकासाठी योग्य नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

नगर परिषदेने स्मारकाच्या कामासाठी निविदा मागविण्यासंबंधी जाहिरात दिल्यानंतर जवळपास एका वषार्नंतर याचिका दाखल करण्यात आली असल्याचे सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली. स्मारकासाठी जमीन निवडणे प्रशासकीय अधिकाराखाली असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. त्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये परवानगी देण्यात आली होती, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. तसेच २०१८ मध्ये या प्रस्तावाला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कामकाज विभागानंही मान्यता दिली होती. तर दुसरीकडे केंद्र सरकारनेदेखील स्मारकाच्या उभारणीसाठी लागणा-या अंदाजित निधीपैकी ७५ टक्के निधी मंजूर केला होता.

स्मारकाच्या उभारणीसाठी आतापर्यंत २.५ कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे. या घडीला हस्तक्षेप केल्यास सार्वजनिक पैशांचा अपव्यय होईल आणि तो हिताचा ठरणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती