सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येच घोळ, वडीलांचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीसांनी केलेला धक्कादायक घोटाळा पुढे आला आहे. सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ आणि कारणच स्पष्ट केलेले नाही, असा आरोप सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीसांनी केलेला धक्कादायक घोटाळा पुढे आला आहे. सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ आणि कारणच स्पष्ट केलेले नाही, असा आरोप सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूवरून महाराष्ट्र आणि बिहारच्या पोलीसांमध्ये सध्या वाद सुरू आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही गेले आहे. सुशांतसिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला आहे. पण यामध्ये सुशांतचा मृत्यू कशामुळे? सुशांतची हत्या करून त्याला लटकवलं गेलं का? की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली? यासंदर्भात पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. एवढचं नव्हे तर त्याच्या मृत्युची वेळच देण्यात आलेली नाही, असे सुशांत सिंहच्या वडीलांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूत हा मुंबईत त्याच्या घरात आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, काही सेलिब्रिटींची चौकशी करण्याव्यतिरिक्त पोलीसांनी काहीही केले नाही. तर सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसही सुशांत प्रकरणाच्या चौकशी करू लागले. त्यासाठी बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत आले होते. मात्र, विमानाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचा नियम असल्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेने त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले होते. यावरुन वादही निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. त्याच वेळी बिहार सरकारने केंद्राला या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार केंद्राकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*