सुशांतसिंहच्या कुटुंबाने संजय राऊत यांना पाठविली मानहानीची नोटीस

सुशांतच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे सुशांत नाराज होता, या धादांत खोट्या आरोपांमुळे सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. सुशांतचे चुलत बंधु आणि भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांनी याप्रकरणी राऊत यांना मानहानीची कायदेशीर नोटिस पाठवली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांतच्या वडिलांना दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे सुशांत नाराज होता, या धादांत खोट्या आरोपांमुळे सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. सुशांतचे चुलत बंधु आणि भाजप आमदार नीरज कुमार सिंह यांनी याप्रकरणी राऊत यांना मानहानीची कायदेशीर नोटिस पाठवली आहे.

त्यावर, अशा हजारो नोटिस रोज मला येतात. मी वस्तुस्थिती पाहून बोललो आहे. मी याप्रकरणी कोणत्याच प्रकारची माफी मागणार नाही, असे उत्तर राऊत यांनी दिले आहे. राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यावर ४८ तासात माफी मागण्याी मागणी करण्यात आली आहे. तसेच, माफी न मागितल्यास अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संजय राऊतांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक या सदरामधून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, एक गोष्ट सत्य आहे की, सुशांतचे त्याच्या पाटण्यातील वडिलांशी संबंध चांगले नव्हते. मुंबई हाच त्याचा आशियाना होता. या सर्व काळात सुशांत वडील व इतर नातेवाईकांना किती वेळा भेटला, सुशांत किती वेळ पाटण्याला गेला ते समोर येऊ द्या.

दरम्यान, जन्माष्टमीची सुट्टी असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कोणाचीच चौकशी केली नाही. ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवतीर्ची दोन वेळा, भाऊ शोविकची तीन वेळा आणि वडील इंद्रजीत यांची एकदा चौकशी केली आहे. याशिवाय मॅनेजर श्रुती मोदी आणि सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीची चौकशी झाली आहे. ईडीने सुशांतची बहिण मीतू सिंहची साक्षही नोंदवली आहे.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी मंगळवारी सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात म्हटले की, कोणीच माझ्या मुलाला फाशी घेताना पाहिले नाही. जेव्हा माझी मुलगी सुशांतच्या घरात गेली, तेव्हा माझा मुलगा बेडवर पडला होता. सुशांत प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयने सुरू केली आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन प्रकरण पाटण्यावरुन मुंबईत शिफ्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करणार का, सीबीआय करणार, यावर गुरुवारी निर्णय होऊ शकतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*