सारथी सभेत खासदार छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत; वडेट्टीवार मात्र अजितदादांच्या शेजारी…!!; सभेत गोंधळ


अजित पवारांनी स्वत: फोन करून संभाजीराजेंना बैठकीसाठी बोलावले होत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सारथी संस्थेसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेतले स्थान देण्यात आले त्यावरून सभेत मान-अपमानाचे नाट्य रंगले. सारथी संस्थेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री विजय वडेट्टीवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांशेजारी बसले होते.

विशेष म्हणजे आजच्या बैठकीचे निमंत्रण खुद्द अजित पवारांनी संभाजीराजे यांना फोन करून दिले होते. या निमंत्रणानंतरही खासदार संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले होते. मंत्री म्हणून वडेट्टीवार मात्र अजित पवारांशेजारी बसले होते. खासदार संभाजीराजे तिसऱ्या रांगेत स्थानावरून बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला.

संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. नंतर या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला.

सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. आता सारथी संस्थेशी निगडीत मतमतांतराच्या नाट्यामध्ये आता आणखी एक वाद जोडला गेला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत मान-अपमानाचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरही बैठक बोलावण्यात आली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था