सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा

सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते, सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते, सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

चीनी व्हायरसचा उद्रेक कमी होण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन टप्याटप्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या अनेक नियमांचे पालन केलेले नाही. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर ‘डफली बजाव आंदोलन’ करण्यात आले.

आंबेडकर म्हणाले, राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो आणि शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका राज्यातील गरीब-शोषित समुहांना बसला आहे. त्यांची रोजीरोटी हिसकावून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाला सुरूवात केली आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*