संयुक्त राष्ट्रसंघात चीनची नामुष्की, काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यात अपयश


संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) पाकिस्तानच्या वतीने काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा चीनचा प्रयत्न फसला आहे. सुरक्षा परिषदेतील पाचपैकी चार देशांनी पाकिस्तानला पाठिंबा नाकारला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) पाकिस्तानच्या वतीने काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा चीनचा प्रयत्न फसला आहे. सुरक्षा परिषदेतील पाचपैकी चार देशांनी पाकिस्तानला पाठिंबा नाकारला.

भारताने जम्मू आणि काश्मीरचा घटनेतील विशेष दर्जा ५ ऑगस्ट, २०१९ रोजी रद्द केल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. बुधवारीच युएनएससीला पाकिस्तानने काश्मीरवर चर्चा करण्याच्या केलेल्या विनंतीला चीनने पाठिंबा दिला होता. परंतु, सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्य देशांपैकी चार जणांनी (अमेरिका, इंग्लड, फ्रान्स आणि रशिया) भारताला पाठिंबा दिला.

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताचाच पूर्णपणे अंतर्गत असलेला विषय उपस्थित करण्याची चीनची ही काही पहिली वेळ नाही. आमच्या अंतर्गत कामकाजात चीनचा हस्तक्षेप आम्ही ठामपणे फेटाळून लावत असून अशा प्रयत्नांतून त्याने योग्य तो निष्कर्ष काढावा, असे आमचे आवाहन आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमुर्ती म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जवळपास सगळ्या देशांनी जम्मू आणि काश्मीर हा द्विपक्षीय विषय असल्याचे मान्य केले आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा वेळ आणि लक्ष वेधण्याचा काही संबंधच नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था