संभाजीनगरमध्ये शिवसेनेला धक्का, जय महाराष्ट्र करत सात नगरसेवक मनसेमध्ये

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही शिवसेनेपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) प्रवेश केला आहे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही शिवसेनेपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सात नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (मनसे) प्रवेश केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्ष प्रवेश पार पडला. मनसेकडून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असतानाच खैरे यांना मनसेने मोठा धक्का दिला आहे. खैरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या सात ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज शिवसेनेला रामराम ठोकून मनसेची वाट धरली आहे. आगामी निवडणुकीत त्याचा चांगलाच फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

शिवसेनेसह विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनसेचा मार्ग चोखाळला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं.  मनसेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. यात काही जण चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. या घडामोडीमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे तर मनसेला मात्र बळ मिळालं आहे.

आगामी निवडणुकीत मनसेला याचा चांगलाच फायदा मिळणार आहे.

खैरे यांचे जवळचे सहकारी सुहास दशरथे यांनी आधीच मनसेत प्रवेश केला होता. दशरथे हे सध्या औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष आहेत. दशरथे यांच्यामुळेच आता आणखी काही शिवसैनिक मनसेत दाखल झाले आहेत. राज यांनी या सर्वांनाच संघटन वाढीसाठी काम करण्याच्या सूचना देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे नेते अभिजीत पानसेही उपस्थित होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*