संपूर्ण जगासाठी कोरोना लस उत्पादनास भारतीय औषध कंपन्या सक्षम : बिल गेट्स यांच्याकडून प्रशंसा


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस जगभरात वाढत असताना संपूर्ण जगासाठी कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनास भारतीय औषध निर्मिती कंपन्या सक्षम आहेत, अशी प्रशंसा बिल गेट्स यांनी केली आहे.

जगभरात कोरोनावरील लसीवर संशोधन सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी याबाबत भारताची प्रशंसा केल आहे. बिल गेट्स यांनी केलेली स्तुती प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.

डिस्कव्हरी प्लसवर गुरुवार संध्याकाळी प्रीमियर होणारी डॉक्युमेन्ट्री ‘COVID-19: India’s War Against The Virus’ मध्ये बिल गेट्स यांनी भारताची स्तुती केली आहे. ते म्हणाताहेत की, भारताचा फार्मासिटिकल उद्योग केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करण्यास सक्षम आहे.

बिल गेट्स यांनी म्हटले की, कोरोनावरील लसीचा शोध लावण्यासाठी भारतातील फार्मासिटिकल कंपन्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. भारतात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अनेक लसी तयार केल्या जात आहेत.

भारतातील फार्मासिटिकल कंपन्या केवळ भारतासाठीच नाही तर जगभरासाठी कोरोनावरील लसींचे उत्पादन करण्यास सक्षम आहेत आणि त्यामुळे आपण कोरोनाच्या महामारीतून मुक्त होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती