संजय राऊतांना स्मृतीभ्रंश झालाय का? राम कदम यांचा सवाल

आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊन हे विसरले की, तेव्हा आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते. यांना स्मृतिभ्रंश झालाय की जनतेचं लक्ष स्वत:चं अपयशापासून झाकण्यासाठी की सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं खापर आधीच्या सरकारवर फोडताना संजय राऊन हे विसरले की, तेव्हा आरोग्यमंत्री शिवसेनेचेच होते. यांना स्मृतिभ्रंश झालाय की जनतेचं लक्ष स्वत:चं अपयशापासून झाकण्यासाठी की सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफीयांना वाचवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही गोष्ट तयार केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी केला आहे.

मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा जम्बो म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर निशाणा साधण्यात आला आहे.

यावरुन राम कदमांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरोग्यमंत्री हा शिवसेनेचाच होता याची आठवण राम कदमांनी करुन दिली आहे. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणार्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे.

पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले असते तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही. पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल, पण अशाने कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणार्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*