षडयंत्र रचणाऱ्यांना उघडे पाडणार, वाढदिवसादिनी खडसेंचा निर्धार

विशेष प्रतिनिधी 

नाशिक : आपले आपल्या राजकीय जीवनात जनतेसाठी कार्य केले असून ते यापुढेही अव्याहतपणे सुरु ठेवणार आहोत, मात्र जीवनात बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत. त्या गोष्टीची उत्तरे आपल्याला हवी आहेत. ती आपण शोधणार असून आपल्याविरूध्द षडयंत्र रचणाऱ्यांना उघडे करेलच, असा निर्धार माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांचा आज वाढदिवस आहे.

श्री.खडसे यांच्या राजकीय प्रवासाला चाळीस पूर्ण होत आहे,या राजकीय जीवनात आपण पक्षाची आणि त्याच माध्यमातून जनतेची सेवा करीत आहोत. मतदार संघासोबतच जिल्ह्यातील व राज्यभरातील जनतेने आपल्याला भरपूर प्रेम दिले आहे, अशी प्रामाणिक भावना ते व्यक्त करतात. आजही आपल्याला जनतेचे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोन येत असतात. त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या कामाचे समाधान वाटत आहे.

पक्षाबाबत असमाधानी

पक्षाबाबत बोलतांना ते म्हणाले, आपण पक्षाबाबत आजही समाधानी नाही. आज पक्षात जे घडत आहोत. त्याबाबत मनाला वेदना होत आहेत.आपण पक्षाविषयी आजपर्यत कधीही वाईट बोललेलो नाही. पक्षातील सर्व नेत्यांना आपण सन्मानच दिला आहे. मात्र पक्षात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून प७ची हानी होत आहे ते आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे आगामी काळात आपण पक्षाच्या वरिष्ठांना भेटून त्यांच्या कानावर ते घालणार आहोत. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भूमिका समजावून घेतल्या पाहिजेत.


षडयंत्र उघडे करणार

राजकीय जीवनात आपण दिलदारपणे वागलो, कुणाशीही षडयंत्र कधीच केले नाही, मात्र आपल्याशी षडयंत्र करण्यात आले, अशी खंत खडसे व्यक्त करतात. ते म्हणाले, षडयंत्र करून आपल्याला राजकीय जीवनात जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझा मानसिक छळ करण्यात आला. राज्यातील जनतेलाही हे लोक कोण आहेत. हे माहित आहेत, त्यांना जनतेसमोर आपण उघडे करणार आहोत.

उत्तरे तर शोधणारच

आपल्या राजकीय जीवनात बरेच प्रश्न आहेत,असे नमूद करून खडसे म्हणाले, राजकीय जीवनातील या गोष्टीची उत्तर आपण शोधणार आहोत. जीवनात बऱ्याच गोष्टींचा घटनाक्रम आहेत. त्या आधी त्याची मला माहिती हवी आहे. आपण तीच सोधणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण धेणार आहोत.त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल.

पुस्तकाच्या माध्यमातून आत्मकथन

आपल्या जीवनाविषयी पुस्तकांच्या माध्यमातून आपण आत्मकथन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकात आपल्या जीवनाविषयी बऱ्याच गोष्टींचा घटनाक्रम आहेत. मात्र हे पुस्तक आपण लिहणार नसून ते पुणे येथील लेखक हे लिहित आहे. मात्र ते पुस्तक प्रसिध्द होण्यास अद्याप बराच वेळ आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात आपला जनतेसी संपर्क सुरुच आहे. आपण जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत,असे सांगुन ते म्हणाले, आपण लवकरच राज्यभर दौरे करणार आहोत. कार्यकर्ते आणि जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून समस्या सोडविण्यावर भर असेल,

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*