शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्राचे महत्त्व पूर्ण पाऊल, कपाशीत 260 तर सोयाबीनमध्ये 170 रुपये वाढ

देशातील 14 खरीप पिकांचे किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास केंद्राने मंजूरी दिल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील तसेच राज्यातील दुष्काळी तालुक्यातील आणि जिरायती शेती करणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्यामुळे माजी कृषी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे किसान मोचार्चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील 14 खरीप पिकांचे किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास केंद्राने मंजूरी दिल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील तसेच राज्यातील दुष्काळी तालुक्यातील आणि जिरायती शेती करणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्यामुळे माजी कृषी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे किसान मोचार्चे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने खरीप 2020-21 करिताचे हमीभाव जाहीर केले. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीस 260, सोयाबीनला 170, भातास 53, तूरीस 200, मुगास 146 तर उडदास 300 रुपये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्यामुळे माजी कृषिमंत्री आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

डॉ. बोंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारचे तसेच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांचे आभार. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*