शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक, चंद्रकांत पाटलांच्या आरोपाशी कृषी मंत्रीही सहमत


पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाबाबत कृषि मंत्री दादा भुसेही सहमत असल्याचे दिसत असून आले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : पीककर्ज मागणार्या शेतकऱ्यांची बॅंकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाबाबत कृषीमंत्री दादा भुसेही सहमत असल्याचे दिसत असून आले.

उस्मानाबाद येथे भुसे यांनी बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र, बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली हेच मान्य केले.

चीनी व्हायरसच्या संकटामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. भाजीपाला, नगदी पिक घेणारा शेतकरी उध्वस्त झाला. त्यातच शासनाची कर्जमाफी कागदावरच राहिली आहे. नव्या पिकासाठी कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंकांमध्ये अपमान होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. वेळ पडली तर कर्ज काढा, परंतु शेतकऱ्यांना कर्ज द्या, अशी मागणी त्यांनी केली.

कर्जमाफी आणि पीककर्ज वाटप या मुद्यावर सोमवारी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागणीचे निवेदन दिले.

पाटील म्हणाले, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा धडाक्यात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली. परंतु, सहा महिने झाले, १८ लाख शेतकऱ्यांच्या नावांची यादीच आली नाही. पहिल्या यादीतच अनेक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलच घेतली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्याच आल्या नाहीत. शासनामध्ये कोणालाच शेतकर्यांच्या समस्यांबद्दल सोयरसुतक नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधीलच कृषी मंत्री दादा भुसे यांनी उस्मानाबाद येथे बोलताना पाटील यांच्या आरोपांना अप्रत्यक्षपणे सहमती दर्शविली आहे. जिल्ह्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपात चालढकल होत आहे. पीक कर्ज वाटपाच्या परीस्थितीबाबत नाराजी व्यक्त करून, आठवडाभरात त्यात सुधारणा न झाल्यास थेट बँकनिहाय आढावा घेऊन टाळाटाळ करणार्या बँकांच्या अधिकार्यांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश भुसे यांनी दिले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती