शिवसैनिक पिसाळले; शिर्डीत सार्वजनिक स्वच्छतागृहास दिले कंगनाचे नाव

  • प्रतिमेस जोडे मारून निषेध

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच पिसाळले असून सर्व धरबंध सोडून शिर्डीतील शिवसैनिकांनी व महिला आघाडीने शिर्डी नगर पंचायतीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाला कंगना राणावतचे नाव दिले. कंगनाचा फोटो त्याठिकाणी चिटकविण्यात आला आहे.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे राज्यातील शिवसैनिक पिसाळून गेले आहेत. शिर्डी शहरातील शिवसैनिकांनी आणि शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कंगनाचा निषेध व्यक्त करूनला आहे. शौचालयावर लावण्यात आलेल्या कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारले.

यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, विजय जगताप, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिताताई जगताप, तालुकाप्रमुख कस्तुरी मुदलियार, शहरप्रमुख लक्ष्मी असणे, तालुका संघटक स्वाती परदेशी, मीनाक्षी डुबल, संगीता जगताप, उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर, अमोल गायके, सोमनाथ महाले तसेच शिवसेना पदाधिकारी व तालुक्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*