शिवसेनेने मुंबईची “तुंबई” करून दाखवली; आ. प्रसाद लाड यांची बोचरी टीका


मुंबईत ‘करून दाखवलं’, असे म्हणणार्या शिवसेनेने खरोखरच मुंबईची ‘तुंबई’ केली आहे. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. ‘मुंबई महापालिकेने ठरवून मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,’ अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईत करून दाखवलं असे म्हणणार्या शिवसेनेने खरोखरच मुंबईची ‘तुंबई’ केली आहे. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. ‘मुंबई महापालिकेने ठरवून मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,’ अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

पावसामुळे मुंबईकरांच्या हालाला पारावर उरलेला नाही. अनेक मंत्र्यांना, कलाकारांनाही पाणी साचल्यामुळे अडकून पडावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विट करून टीका केली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय. याला मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि कोरोना जबाबदार आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत पाणी साचले पाहिजे अशी व्यवस्था यंदाही मुंबई महापालिकेने केलेली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

मुंबई संकटात असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घरी बसूनच आढावा घेत आहेत. त्यावरही लाड यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. ‘सर्वांनी घरीच राहा.गरम पाणी प्या,’ असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईला संकटातून बाहेर काढण्याऐवजी ठाकरे सरकारमधील मंत्री पावसाला दोष देत आहेत. पावसामुळेच मुंबईची अशी अवस्था झाली आहे, असे म्हणत उपाययोजना करण्यापासून मात्र पळ काढत आहेत. त्यावरही टीका होत आहे.

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नगरमध्ये बोलताना मुंबईतील स्थितील शिवसेनेचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे सांगत त्यांच्यामुळेच मुंबईची ही दुर्दशा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी केला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था