शिवसेना नेत्यांच्या बऱ्याच खासगी बाबी, संजय निरुपम यांचा राऊतांना इशारा


प्रत्येक कुटुंबाच्या काही खासगी बाबी असतात. शिवसेनेच्या नेत्यांच्याही बऱ्याच खासगी बाबी आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेत्यांच्या आणि ठाकरे कुटुंबाची अंडीपिल्ली बाहेर काढण्याचा इशारा कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रत्येक कुटुंबाच्या काही खासगी बाबी असतात. शिवसेनेच्या नेत्यांच्याही बऱ्याच खासगी बाबी आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेत्यांच्या आणि ठाकरे कुटुंबाची अंडीपिल्ली बाहेर काढण्याचा इशारा कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.

प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांनी दोन लग्ने केली होती, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर निरुपम यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. निरुपम म्हणाले, सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांबाबत शिवसेनेचे खासदार खूपच खालच्या थराला जाऊन बोलत आहेत. प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते. शिवसेनेतील लोकांचीही आहे. या प्रकरणी शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी. कोतेपणा करू नये.

संंजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून सुशांतच्या कुटुंबीयांबाबत भाष्य केलं होतं. सुशांतच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्याने या बापलेकांचं जमत नव्हतं, असा दावा राऊत यांनी केला होता. सुशांतचे त्याच्या पाटण्यातील वडिलांशी संबंध चांगले नव्हते. मुंबई हाच त्याचा आशियाना होता. या सर्व काळात सुशांत वडील व इतर नातेवाईकांना किती वेळा भेटला, सुशांत किती वेळ पाटण्याला गेला ते समोर येऊ द्या.

अंकिता लोखंडे व रिया चक्रवर्ती या दोन अभिनेत्री तरुणी त्याच्या आयुष्यात होत्या. यापैकी अंकिताने सुशांतला सोडले व रिया त्याच्या सोबत होती. आता अंकिता रिया चक्रवर्तीविषयी वेगळे बोलत आहे. मुळात अंकिता व सुशांत हे वेगळे का झाले त्यावर प्रकाश पाडायला कोणी तयार नाही. तपासाचा तो एक भाग असायला हवा, असे राऊत यांनी म्हटले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती