शिवरायांचा पुतळा हटवायला काँग्रेस आमदार जारकीहोळींनी सांगितले; शिवसेना त्यांना जाब विचारणार का?


विशेष प्रतिनिधी

बेळगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी राजकारण सुरू असताना त्यातील fact check केल्यावर लक्षात वेगळे प्रकरण लक्षात आले. पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवायला कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळींनी सांगितले. प्रश्न हा आहे, या प्रकरणावर महाराष्ट्रात राजकारण करणारी शिवसेना काँग्रेसच्या बड्या नेत्याला जाब विचारणार का? की महाराष्ट्राची सत्ता वाचविण्यासाठी नुसते राजकारण करत राहणार?

 • काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चबूतऱ्याचे पूजन होऊन पुतळा बसवायचा कार्यक्रम सकाळी नियोजीत होता.
 • आमदार जारकीहोळी यांचा कार्यक्रम होण्याआधीच मराठा-वाल्मिकी समजा चा वाद झाला आणि काही मराठा बांधवांनी सकाळ होण्याची वाट न पाहता आदल्याच रात्री पुतळा बसवला. गावात ८०% मराठा समाजबांधव आहेत.
 • त्यावर आमदार सतीश जारकीहोळी यांनी विचारले, तुम्ही घाई का केली? आता कायदेशीर परवानगी घेऊन परत बसवूया, तो पर्यंत पुतळा हलवा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. जारकीहोळी यांनी पंच आणि पुतळा कमिटीच्या लोकांबरोबर मग मिटिंग घेतली.
  आमदारांनी पंच आणि पुतळा कमिटी ला सांगितले की ५ दिवसांनंतर निर्णय घेतो. जारकीहोळी यांच्या आश्वासनानंतर पंच आणि पुतळा कमिटीने पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवला!
 •  आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेल्या बैठकीत ठरवल्याप्रमाणे पुतळा सुरक्षित ठिकाणी नेताना कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
 • आमदार सतीश जारकीहोळी यांना भेटून शिवसेना आता निवेदन देणार आहे. म्हणजे कोणाला? तर, त्याच आमदारांना देणार ज्यांनी स्वतःच ‘पुतळा हलवून सुरक्षित जागी ठेवा’ सांगितले.
 • आमदार सतीश जारकीहोळी काँग्रेसचे आमदार आहेत आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.
 • महाराष्ट्रात काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या शिवसेनेत आता आपल्याच मित्र-पक्षाला व सत्तेतील भागीदार काँग्रेसला जाब विचारायची हिंमत आहे का?
 •  शिवसेनेचे नेतृत्व जर काँग्रेसला याविषयी ‘रोखठोक’ सवाल विचारत नसेल, तर शिवसैनिकच त्यांच्या सरसेनापतीला ‘जाब का विचारत नाहीस’ असा जाब विचारणार आहेत का?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था