शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस जीप खंडाळा घाटात अमृतांजन पुलाखाली उलटली

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीसांची पायलट जीप मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाच्या खाली सोमवारी (29 जून) उलटली. पवारांची गाडी सुखरुपपणे रवाना झाली.

यामध्ये पोलिसांच्या जीपमधील एकाला किरकोळ मार लागला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजचा सोमवार अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहर‍च्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृत‍ांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली.

शरद पवार यांचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात आडवी झाली. महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलीसांनी तात्काळ गाडीमधील चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्माचार्‍यावर प्राथमिक उपचार करत अपघातग्रस्त वाहन बाजुला केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*