वीजबिलांना स्थगिती द्या; अन्यथा भाजपाचा आंदोलनाचा इशारा


राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असताना सुद्धा मुंबई शहरातील अदानी सारख्या खाजगी कंपन्यांनी किंवा इतर सरकारी कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारली आहेत. त्यामुळे या वीज वितरण कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून वीज देयकांना स्थगिती देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असताना सुद्धा मुंबई शहरातील अदानी सारख्या खाजगी कंपन्यांनी किंवा इतर सरकारी कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारली आहेत. त्यामुळे या वीज वितरण कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून वीज देयकांना स्थगिती देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

प्रधानमंत्री आर्थिक पॅकेज मध्ये राज्य सरकारच्या वीज वितरण कंपन्यांकरिता 90 हजार कोटींचे सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. शासन वीज देयकं माफ करण्याची भूमिका घेत नाही हे केवळ दुदैर्वी नाही तर संतापजनक आहे अशी टीका आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याकरिता, 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करण्याची मागणी सातत्याने त्यांनी केली होती. परंतु या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने कायम दुर्लक्ष करण्याचेच काम केले.

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग कायद्यातील कलम 4 प्रमाणे राज्यातील सर्व वीज देयकांना तात्काळ स्थगिती द्यावी व 300 युनिटपर्यंत वीज देयके माफ करून नव्याने वीज देयके आकारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे. राज्य सरकार कडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था