वादा किया तो निभाना पडेगा, बबनराव लोणीकर यांचे नबाब मलिक यांना आव्हान

राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करा. नाहीतर आश्वासन पूर्ण करू शकत नसल्याबद्दल प्रायाश्चित म्हणून राजीनामा द्या. कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा, असे आव्हान भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.


विशेष प्रतिनिधी

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करा. नाहीतर आश्वासन पूर्ण करू शकत नसल्याबद्दल प्रायाश्चित म्हणून राजीनामा द्या. कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा, असे आव्हान भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात या कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ईगल कंपनीच्या मालकाला अटक करण्यासाठी परभणी पोलिसांनी एक विशेष पथकं तयार केलं आहे. हे पथक इंदोरला जाऊन आरोपी मालकाला अटक करणार असल्याचे सांगितले आहे.

त्यावर लोणीकर म्हणाले, नवाब मलिक साहेब बोलणं सोपे आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणं सोपे आहे. परंतु प्रत्यक्षात कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल. कोर्टापुढे न्यावं लागेल. अन्यथा तुम्हाला प्रायश्चित म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तुम्ही जर त्यांना अटक केली, तर परभणीच्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करेन, असे बबनराव लोणीकर म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*