वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा; सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

  • २००५ पूर्वीच्या प्रकरणांनाही कायदा लागू राहणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक महत्त्वाचा निर्णय देत साऱ्या देशाचे लक्ष वेधले. मुलींचाही वडिलांच्या संपत्तीवर मुलांइतकाच अधिकार असल्याचे मान्य करत त्यावर शिक्कामोर्तब केले. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या नेत्तृत्त्वाखालील तीन न्यायाधीशांच्या  खंडपीठाने हा निर्णय दिला.

हिंदू वारसा दुरुस्ती अर्थात Hindu Succession (amendment) Act 2005 अस्तित्वात आला त्यावेळी वडील हयात असो किंवा नसो, मुलींना मुलांप्रमाणेच त्यांच्या संपत्तीमध्ये समान हक्क मिळणार असल्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असणाऱ्या सर्व मुलींना या सुधारित कायद्यान्वये मिळणारे अधिकार प्राप्त होतील.

९ सप्टेंबर २००५ ला तत्कालीन केंद्र सरकारकडून हिंदू वारसा कायद्यातील कलम ६ मध्ये महत्त्वाची दुरूस्ती करण्यात आली होती. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीमध्ये किंवा एकूणच संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही समान वाटा मिळण्यासंदर्भातील ही दुरुस्ती होती. असे असले तरीही ही दुरुस्ती अद्यापही अंमलात आणण्यात आली नव्हती.

२००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलींना हा हक्क मिळणार की नाही याबाबत मात्र स्पष्टता नव्हती. पण, आता मात्र ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळं वडिलांच्या संपत्तीत यापुढे मुलींनाही मुलांप्रमाणेच समान हक्क मिळणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*