लाज वाटते का? रियाच्या समर्थनासही उतरलीस, नेटकऱ्यांनी स्वरा भास्करला फटकारले

विरोधी मते प्रदर्शित करून बेगडी लोकप्रियता मिळविण्याचे व्यसन लागलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करला रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले आहे. लाज वाटत नाही का? असा सवाल तिला करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विरोधी मते प्रदर्शित करून बेगडी लोकप्रियता मिळविण्याचे व्यसन लागलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करला रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले आहे. लाज वाटत नाही का? असा सवाल तिला करण्यात आला आहे.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन असो की शाहीनबागेतील धरणे स्वरा भास्कर तेथे जाऊन मीडियाचे लक्ष्य वेधून घेतले. आपल्या चित्रपटांपेक्षा या गोष्टींतूनच प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वराने यामुळेच वेगळी भूमिका मांडायची म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस आणि इडीकडून रियाची चौकशी सुरू आहे. मात्र, माध्यमांवर याबाबतच्या वृत्तांकनावरून रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. माध्यमे आपल्याला बळीचा बकरा बनवित आहेत, असे तिने म्हटले आहे. स्वरा भास्करने यावरूनच रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला. ट्विटमध्ये म्हटले आहे की रिया एका खतरनाक मीडिया ट्रायलमध्ये अडकली आहे.

भडकाऊ जमाव त्याचे नेतृत्व करत असून आग ओतण्याचे काम करत आहे. मला पूर्ण आशा आहे की, माननीय सुप्रीम कोर्ट चुकीच्या बातम्या चालविणाऱ्या मीडियावर निश्चितच लक्ष देईल. जे काही असेल ते कायद्याप्रमाणे होऊन जाऊ द्या.

स्वराच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले आहे. एकाने म्हटले आहे की आजपर्यंत राहिलेली सगळी कसर या मॅडमने पूर्ण केली आहे. आता रियाला खरोखरच कोणाचा पाठिंबा मिळणार नाही. दुसऱ्याने तर लाज वाटायला हवी, आता रियाच्या समर्थनातही तुम्ही उतरलात असे म्हटले आहे. एवढी सगळी चर्चा सुरू असताना आपले नाव येत नसल्याने स्वरा वैफल्यग्रस्त झाली आहे.

मीडियात कशाही प्रकारे आपले नाव यावे म्हणून काहीही करायला ती तयार असते, असे एकाने म्हटले आहे. तर रसभरीसारख्या थर्ड रेट वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या स्वराकडून अजून अपेक्षा तरी काय करायची, असा सवाल एकाने केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*