लस उत्पादकांसासाठी सर्व काही, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने घेतली भेट

चीनी व्हायरसवर होणाऱ्या लस संशोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिले आहे. यासाठी एका राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सोमवारी देशातील लस उत्पादकांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसवर होणाऱ्या लस संशोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिले आहे. यासाठी एका राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने सोमवारी देशातील लस उत्पादकांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. भारतामध्ये काही कंपन्यांचे चीनी व्हायरसवरील लस उत्पादन सकारात्मक पातळीवर गेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी या लस उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. याबाबत कार्यवाहीसाठी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली आहे. हा तज्ज्ञ गट सातत्याने लस उत्पादनकांना भेट आहे.

त्याप्रमाणे सोमवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पुणे), भारत बायोटेक (हैदराबाद), झायडस कॅडिला (अहमदाबाद), जिन्नोवा बायोफॉर्मास्युटिकल्स (पुणे) आणि बायोलॉजिकल ई. (हैदराबाद) या लस उत्पादक कंपन्यांची भेट घेण्यात आली.

ही बैठक सरकार आणि उत्पादकांसाठी लाभकारी व उपयुक्त ठरली, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले. देशातील वेगवेगळ्या उत्पादकांकडून विकसित केल्या जात असलेल्या निरनिराळ्या लसी सध्या कोणत्या पायरीवर आहेत आणि केंद्र सरकारकडून उत्पादकांना कोणत्या अपेक्षा आहेत याची माहिती राष्ट्रीय तज्ज्ञ गटाला दिली गेली, असेही निवेदनात म्हटले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*