लपवायचे नाही तर सीबीआयकडे तपास देण्यास घाबरता कशाला, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल


जर आम्हाला काही लपवायचं नाही असे ठाकरे सरकारमधील नेते मंडळी सांगत होते तर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण वेळीच सीबीआयकडे वर्ग का केले नाही? तुमची पाटी कोरी आहे, तर भीता का बाळगता असा सवाल माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : जर आम्हाला काही लपवायच नाही असे ठाकरे सरकारमधील नेते मंडळी सांगत होते तर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे वर्ग का केले नाही? तुमची पाटी कोरी आहे, तर भीता का बाळगता असा सवाल माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, बिहार सरकारने केंद्र सरकारला शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची परवानगी मिळवली आहे.

आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र केंद्राकडे शिफारस करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार हे प्रकरण सीबीआयकड़े वर्ग करण्यासाठी का संमती देत नव्हतं? मुंबई पोलिसांवर आम्ही कधीही आक्षेप घेतला नाही आणि पोलिसांवर कोणताच आक्षेप नव्हता परंतु मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतात याला सर्वांचा आक्षेप होता.

खरं तर या प्रकरणामध्ये राजकीय क्षेत्रातील, बॉलिवूड तसेच अंडरवर्ल्ड मधील काही लोक असल्याची माहिती आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी सहाजिक आहे.

वास्तविक पाहाता महाराष्ट्र राज्य सरकारची जर पाटी कोरी आहे आहे तर आपण भीती कशाची बाळगता, जर तुमचा या प्रकरणाशी काहीही सबंध नाही तर आरोप प्रत्यारोप न करता तुम्हीच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याची गरज होती. आता हे प्रकरण सीबीआयकड़े गेल्याने या प्रकरणाचा योग्य तपास करेल, असे विखे पाटील म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती