रियाने ‘एयू’ला केला तब्बल ६३ वेळा कॉल

सुशांंत सिंह राजपूत प्रकरणात ‘एयू’ नाव आता सातत्याने घेतले जात आहे. रियाने याच एयूला काही दिवसांच्या कालावधीत तब्बल ६३ वेळा फोन केल्याचे उघड झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांंत सिंह राजपूत प्रकरणात ‘एयू’ नाव आता सातत्याने घेतले जात आहे. रियाने याच एयूला काही दिवसांच्या कालावधीत तब्बल ६३ वेळा फोन केल्याचे उघड झाले आहे. हा एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असून या फोन कॉल्समागची सत्यता उजेडात आली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची आर्थिक व्यवहाराच्या अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने तिच्या मोबाइलवरून ‘एयू’ नावाच्या व्यक्तीशी काही दिवसांच्या कालावधीत तब्बल ६३ वेळा कॉल केल्याची माहिती आहे. ‘अनन्या उधास’ असे तिच नाव असल्याची माहिती रियाने दिली. मात्र, तिच्याशी इतक्यावेळा संभाषण करण्यामागील कारणांबाबत ईडीचे अधिकारी तपास करीत आहेत.

ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर रियासह सहा जणांकडे चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ती सहकार्य करीत नसल्याने अधिकाऱ्यांनी तिचे दोन मोबाइल, लॅपटॉप तसेच तिचा भाऊ शोविक व वडील इंद्रजीत यांचे मोबाइल जप्त केले. त्यातील डाटा व कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात येत असून रियाने सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर अनेकांशी संपर्क साधल्याचे तपासातून पुढे आले आहे. कॉल डिटेल्सनुसार, रिया बॉलीवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचे समोर आले. आमिर खान, रकुल प्रीत सिंग, आदित्य रॉय कपूर, राणा डग्गुबाती, सनी सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्याशी तिने मोबाइलवर संवाद साधल्याची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिने आमिर खानला एकदा फोन केला तर आमीरने तीन मेसेज पाठवले. रियाने आदित्य रॉय कपूरला १६ वेळा कॉल केला तर आदित्यने तिला सात वेळा कॉल केला. श्रद्धा कपूरला तिने तीन वेळा कॉल केला तर श्रद्धाने दोनदा फोन केला. रियाला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता सनी सिंगने सात वेळा कॉल केला, तर तिने चार वेळा फोन केला. रिया राणा डग्गुबातीशीही बोलली. ती महेश भट्ट यांच्याही सतत संपर्कात होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*