रिझर्व्हेशन करणारे बोगस सॉफ्टवेअर रेल्वेकडून उध्वस्त, ५० जणांच्या आवळल्या मुसक्या

बोगस रेल्वे रिझर्व्हेशन करताना ग्राहकांची माहिती चोरणारे बोगस सॉफ्टवेअर रेल्वेकडून उध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी ५० सायबर चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रिअल मँगो नावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे कामकाज खंडित केल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बोगस रेल्वे रिझर्व्हेशन करताना ग्राहकांची माहिती चोरणारे बोगस सॉफ्टवेअर रेल्वेकडून उध्वस्त करण्यात आले. याप्रकरणी ५० सायबर चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रिअल मँगो नावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे कामकाज खंडित केले. हे सॉफ्टवेअर आता पूर्णपणे निकामी झाले आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) देशव्यापी तपासणीत रेल्वे आरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या रिअल मँगो नावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे कामकाज खंडित केले आहे. प्रवासी सेवा पुन्हा सुरू केल्यावर अनधिकृत तिकीट विक्रीत वाढ होण्याची भीती लक्षात घेता काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भारतीय रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) जोरदार कारवाई सुरू केली.

उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर), पूर्व रेल्वे (ईआर) आणि पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) च्या आरपीएफ तुकड्यांनी काही संशयितांना पकडले. रियल मँगो सॉफ्टवेअरची कार्यवाही समजून घेण्याची व उलगडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातून मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने बँक ओटीपीचे संकलन करते आणि त्यास स्वयंचलितपणे आवश्यक रूपात फीड करते.

आत्तापर्यंत या अवैध सॉफ्टवेअरच्या संचालनात किंग पिन (ही प्रणाली विकसित करणारा) आणि मुख्य व्यवस्थापकांसह 50 गुन्हेगारांना पकडण्यात आले. पश्चिम बंगालमधून अवैध सॉफ्टवेअरच्या पाच प्रमुख चालकांना अटक करण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर आता पूर्णपणे निकामी झाले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*