राहुल गांधींचे अज्ञान शरद पवारांनी केले उघड !


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विशिष्ट परिस्थितीत सैनिकांनी शस्त्र बाळगायचे की नाही हा विषय आंतरराष्ट्रीय करारांच्या अखत्यारितला असतो. त्यामुळे त्याचे पालन करणे हे प्रत्येकासाठी अतिशय गरजेचे असते, असे मत मांडत माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीचे ज्ञान अतिशय तोकडे असल्याचे बैठकीत सिद्ध केले.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टिका करताना भारतीय सैन्यावर हल्ला कसा झाला, भारतीय सैनिकांकडे शस्त्रे का नव्हती असे प्रश्न अत्यंत आवेशात विचारले होते. खरे तर अशा संवेदनशील विषयांवर बोलताना राहुल यांनी पुरेशी माहिती घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी तसे केले होते.

मात्र, राहुल गांधी यांच्या अज्ञानाचे जाहिर प्रदर्शन माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनीच बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना करून दिले. पवार बैठकीत म्हणाले, विशिष्ट परिस्थितीत सैनिकांनी शस्त्र बाळगायचे की नाही हा विषय आंतरराष्ट्रीय करारांच्या अखत्यारीत असतो. त्यामुळे त्याचे पालन करणे हे प्रत्येकासाठी अतिशय गरजेचे असते, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राहुल गांधी हे गंभीर राजकारणी नाहीत, ते अभ्यास करून बोलत नाहीत हेच पवारांनी सिद्ध केले.

यापूर्वीदेखील गुरूवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील त्यासाठी १९९६ आणि २००५ साली झालेले करार कारणीभूत असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांना दिले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती