राहुल गांधींकडे नाही कॉंग्रेसला पुन्हा उभे करण्याची क्षमता, कॉंग्रेसच्या नेत्याचाच घरचा आहेर

कॉंग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून कॉंग्रेसच्या रचनेत बदल करण्याची मागणी करण्याच्या बहाण्याने राहुल गांधी यांच्या क्षमतेवर शंका व्यक्त केली. आता कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने थेटच राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी कॉंग्रेसला पुन्हा उभे करू शकणार नाहीत, असे या नेत्याने म्हटले आहे.


विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून कॉंग्रेसच्या रचनेत बदल करण्याची मागणी करण्याच्या बहाण्याने राहुल गांधी यांच्या क्षमतेवर शंका व्यक्त केली. आता कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने थेटच राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राहुल गांधी कॉंग्रेसला पुन्हा उभे करू शकणार नाहीत, असे या नेत्याने म्हटले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत अगदी २३ ज्येष्ठ नेत्यांपासून कोणाही दुसर्या नेत्याने अगदी मनात असूनही राहुल गांधी यांचे नाव घेतले नव्हते. परंतु, आता एका ज्येष्ठ नेत्याने थेट टीका करत ही कोंडी फोडली आहे.

सतत दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी राहुल गांधी हे उपयुक्त व्यक्ती नाहीत असे या नेत्याने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्याकडेच पुन्हा पक्षाचे नेतृत्व देण्याची मागणी कॉंग्रेसच दरबारी नेते करत आहेत. परंतु, आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या नेत्याने म्हटले आहे की, खरेच राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करू शकतील का, हे सांगण्याचा स्थितीत आम्ही नाही आहोत. सन २०२४ मध्ये ४०० जागा निवडून आणण्यात खरेच राहुल गांधी आमची मदत करतील का, हे सांगता येत नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षेप्रमाणे जागा मिळू शकलेल्या नाहीत याची जाणीव आम्हाला असणे गरजेचे आहे.

नागपूरपासून ते शिमल्यापर्यंत (देशाच्या अर्ध्या उत्तरेकडील भागात) काँग्रेस पक्षाचे एकूण १६ खासदार आहेत. यांपैकी देखील ८ फक्त पंजाबमधून आहेत. आम्ही भारतात आहोत आणि सत्य काही वेगळेच आहे, हे आम्हाला आता मान्य करायला हवे. जर बैठक झालीच तर मी या मुद्द्यावर माझे विचार नक्कीच मांडेन, असे हा नेता म्हणाल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*