राणे बंधू पार्थ पवारांच्या मागे उभे, आजोबांनी नातवाची लायकी काढल्याचे पहिल्यांदाच पाहिले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्यावर तोंड लपविण्याची वेळ आली. या वेळी नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश पार्थच्या मागे उभे राहिले आहे. नितेशने मित्रा, असे म्हणून पार्थला संबोधले आहे तर निलेश यांनी तर एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, असे म्हणून शरद पवारांवर टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्यावर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. या वेळी नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश पार्थच्या मागे उभे राहिले आहे. नितेशने मित्रा, असे म्हणून पार्थला संबोधले आहे तर निलेश यांनी तर एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, असे म्हणून शरद पवारांवर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वत:च्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता?

तर, या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली होती. त्यांनी पार्थ यांना लंबी रेस का घोडा म्हटलं होतं. आज परत सांगतो. पार्थ लंबी रेस का घोडा आहे. थांबू नकोस मित्रा, असं नितेश यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.

यावर पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. दरम्यान यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात परस्परांविषयीची खदखद असून याचा स्फोट कधीही होऊ शकते, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*