राजीव गांधी फाऊंडेशनने फरार मेहूल चोक्सीकडूनही घेतली वर्गणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्यावसायिक परिषदेत मेहूल चोक्सीचा ‘मेहूलभाई’ असा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या कॉंग्रेसनेच चोक्सीकडूनच वर्गणी घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे कॉंग्रेसवर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून देशी-विदेशी कंपन्यांकडून सरकारी कामासाठी खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्यावासायिक परिषदेत मेहूल चोक्सीचा ‘मेहूलभाई’ असा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या कॉंग्रेसनेच चोक्सीकडूनच वर्गणी घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे कॉंग्रेसवर तोंड लपविण्याची वेळ आली आहे.

राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून देशी-विदेशी कंपन्यांकडून सरकारी कामासाठी खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी केला आहे. देशातून फरार झालेल हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याच्याकडून राजीव गांधी फाऊंडेशनला मोठी देणगी देण्यात आली होती. यामुळे आत्तापर्यंत चोक्सी आणि निरव मोदी प्रकरणात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर देणे मुश्किल झाले आहे.

मेहूल चोक्सी याच्या नविराज इस्टेटस  प्राइवेट लिमिटेड या कंपनीकडून ही देणगी देण्यात आली होती. मालविय यांनी आरोप केला आहे की, राजीव गांधी फाऊंडेशन केवळ एक मुखवटा आहे.

शेल कंपनीप्रमाणे काम करत आहे. सरकारी संरक्षण देण्याच्या नावाखाली देश विदेशातील कंपन्यांकडून रक्कम घेतली जात होती. ही रक्कम राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी मिळाल्याचे दाखविले जात होते. यामध्ये अनेक परदेशी कंपन्याही आहेत. १९९२ साली सुरू झालेल्या फाऊंडेशनने अनेक लोकांकडून याच पध्दतीने देणग्या घेतल्या.

मेहूल चोक्सीने पंजाब नॅशनल बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळातच हे कर्ज देण्यात आले होते. चोक्सी या बॅंकेसह अनेक बॅंकांना फसवून परदेशात पळून गेला. कॉंग्रेसच्या कार्यकाळात २००४ ते २०१४ पर्यंत राजीव गांधी फाऊंडेशनवर देणग्यांची बरसात होत होती. केवळ चोक्सीनेच नव्हे तर ओएनजीसी, शेल, गेल, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, ओरिटंटल बँक ऑफ कॉमर्स, हुडको, आयडीबीआयसारख्या अनेक सार्वजनिक उपक्रमांनीही फाऊंडेशनला देणग्या दिल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*