राऊतांची मुंबई, कंगनाची मुंबई


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरण रोज वेगवेगळी वळणे घेत असताना सोशल मीडिया शाब्दिक युद्ध रंगताहेत. सुशांत, रिया चक्रवर्ती, आदित्य, बॉलिवूड नेपोटिझम, ड्रग पँडेलिंग अशी नवी नवी वळणे घेत वाद आता मुंबई कोणाची? यावर येऊन ठेपला आहे. त्यात राजकीय रंग ठासून भरले आहेत. दोन्ही बाजूंच्या ट्रोल सेना एकमेकांवर जोरदार हल्ले चढवताहेत. एकमेकांचे बोलवते धनी काढले जात आहेत.

कंगना राणावतचा मुंबईतल्या “पाकव्याप्त काश्मीरमध्ये” जीव काय घुसमटला त्यातून हे शाब्दिक रणकंदन सुरू झाले. दोन्ही बाजू एकमेकांवर तुटून पडल्या. कंगनाला ट्रोल करणे सुरू झाले. प्रश्न – उत्तर – प्रत्यूत्तरांच्या फैरी झडताहेत. मुंबई जणू फक्त “आमचीच” असे आवेश आणले जाताहेत. एकमेकांना मुंबईच्या बाहेर काढण्याच्या बाता होताहेत. सोशल मीडियातील या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासचे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी मुंबईच्या कवितेतून मुंबईच्या स्वयंघोषित “मालकांना” थप्पड लगावली आहे. मुंबई नेमकी कोणाची याचे उत्तर दिले आहे.

आमची मुंबई

– रामराजे शिंदे- 

‪आमची मुंबई‬, बलिदानाची मुंबई‬

मराठी माणसांची मुंबई

‪ढसाळांची प्रिय रांडे मुंबई‬

‪कोरोना हाॅटस्पाॅट मुंबई‬

‪पाण्यात तुंबलेली तुंबई‬

‪दंगलीच्या जखमांची मुंबई‬

‪जावेद मियाँदादच्या पाहुणचाराची मुंबई‬

कामगारांची मुंबई

जाॅर्ज फर्नांडिसच्या आंदोलनाची मुंबई

दत्ता सामंतांच्या हत्येची मुंबई

श्रीकृष्ण आयोगातील आरोपींची मुंबई

पुरोगाम्यांची मुंबई, जातीयवाद्यांची मुंबई

जातीयवाद्यांना स्वीकारणाऱ्या नव पुरोगाम्यांची मुंबई

‪मराठींच्या मतांवर पोळी भाजणाऱ्यांची मुंबई‬

मराठींना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्यांची मुंबई

खड्ड्यांची मुंबई‬, गटारांची मुंबई

लुटारूंची मुंबई, बारवाल्यांची मुंबई

कारवाल्यांची मुंबई, शाखा सम्राटांची मुंबई

राजकीय गुंडांची मुंबई, चौकडी चांडाळांची मुंबई

अविघ्ना टाॅवरवाल्याची मुंबई

बीएमसी लुटणाऱ्यांची मुंबई

अपहरणाची मुंबई, इलेक्ट्रीक सरणाची मुंबई

‪स्वर्ग मुंबई, नर्क मुंबई‬

मलबार हिलसाठी कश्मीर मुंबई ‬

‪धारावीसाठी पाकव्याप्त कश्मीर मुंबई‬

बाहेरून आलेल्यांची मुंबई

मुंबई बाहेर न पडलेल्यांची मुंबई

मातोश्रीची मुंबई, सिल्वर ओकची मुंबई

मुख्यमंत्र्यांची मुंबई, वाजंत्र्यांची मुंबई

रागावणाऱ्यांची मुंबई

ओरडणाऱ्यांची मुंबई

धमक्या देणाऱ्यांची मुंबई

धमक्या खाणाऱ्यांची मुंबई

राऊतांची मुंबई, कंगना राणावतांची मुंबई

इतर कलाकारांची मुंबई

कलानगर’च्या कलाकारांचीही मुंबई

चाकऱ्यांची मुंबई, ठाकऱ्यांची मुंबई

फेरीवाल्यांची मुंबई, डबेवाल्यांची मुंबई

मर्दांची मुंबई, नामर्दांची मुंबई

‪सोन्याचं अंडं देणारी मुंबई‬

पाळीव प्राण्यांची मुंबई

माणसांतल्या जनावरांची मुंबई

विघ्नांची मुंबई, विघ्नहर्त्याची मुंबई

आमची मुंबई, सर्वांची मुंबई !

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती