जिनपिंग यांच्याशी साधर्म्य असल्यावरून ऑपेरा गायकाचे टिक टॉक अकांऊट हटविले
वृत्तसंस्था
बीजिंग : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डुप्लिकेट सेलिब्रिटी म्हणून प्रचारात, समारंभांमध्ये मिरवताना दिसतात, तर दुसरीकडे चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या डुप्लिकेटला मात्र टिक टॉकने बंदी घालून एक प्रकारे त्याला डिजिटल बंदीवासातच टाकले आहे.
चीनची माओवादी कम्युनिस्ट राजवट एकाच वेळी कशी क्रुर आणि मुर्ख आहे, याचा प्रत्यत जगाला येतोय. एकीकडे ते चीनी सैनिकांच्या बलिदानाची किंमत ठेवत नाहीत तर दुसरीकडे नागरिकांच्या स्वातंत्र्याची एखाद्या किरकोळ कारणावरूनही गळचेपी करतात, हे यातून दिसून येते.
शी जिनपिंग यांच्याशी मिळता-जुळता चेहरा असल्याने एका प्रसिद्ध ऑपेरा गायकाला टिकटॉक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. लिऊ केकिंग (वय 63) असे या प्रसिद्ध ओपेरा गायकाचे नाव असून, ते बर्लिनमध्ये राहतात. त्यांचा चेहरा शी जिनपिंग यांच्याशी जुळतो. त्याचाच लिऊ हे सोशल मीडियावर फायदा उचलत असल्याचा आरोप करत चीनने त्यांच्या सोशल मीडिया वापरास मर्यादा आणली आहे. तर टिक टॉक वापरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
मोदींचे डुप्लिकेट अभिनंदन पाठक यांनी २०१९ च्या प्रचारात जान आणली. राजनाथ सिंह यांच्या विरोधात अर्ज भरला. राहुल गांधींबरोबर फोटो काढून मिरवले. तिकडे मात्र लिऊ किकिंग टिक टॉकला मुकले
लिऊ केकिंग यांचे टिक टॉकवर 41 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी ऑपेरा गायनाचे अनेक व्हिडीओ टिक टॉकवर शेअर केले आहेत. मात्र, त्यांचे हे अकाउंट बंद करण्यात आले आहे. इमेज वॉयलेशनमुळे असे करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर लिऊ यांनी टिक टॉकवर दुसरे अकाउंट उघडले. मात्र, ते ही अकाउंट बंद करण्यात आले