राज्यातील महाविकास आघाडी चीनी व्हायरसच्या संकटातही तुंबड्या भरणाऱ्यांना खुला वाव देत आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाला दिल्याचा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला आहे. या प्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी चीनी व्हायरसच्या संकटातही तुंबड्या भरणाºयांना खुला वाव देत आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाला दिल्याचा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला आहे. या प्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली आहे. जनतेच्या पैशावर उभारलेली जम्बो कोविड सेंटर ठेकेदारांच्या हितासाठी असल्याची टीका दरेकर यांनी केली.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असा आरोप भाजपने केला आहे. विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी हा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री सातत्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांवर मोफत उपचार केल्याचे सांगत आहेत. मात्र, आत्तापर्यंत अवघ्या 4,878 रुग्णांना लाभ मिळाला असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. या योजनेतील 31 हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्याचे कारण 540 कोटींचा पुरवणी खर्च तुटपुंजा आहे. त्यामुळे लाभार्थी रुग्णांची संख्या जाहीर करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे.
मुंबईतील कोव्हिड सेंटरचे काम देण्यात मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. वरळी व इतर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉपोर्रेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले. त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासण्यात आला होता का? कारण या कंपनीच्या अॅडिशनल डायरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव सरप्रसाद पेडणेकर आहे असे मनसेने म्हटले होते. इतरांना ही टेंडर का मिळाली नाही असा सवालही केला होता.