मानवाधिकारांची गळचेपी, जागतिक पातळीवरच चीनला घेरण्याची तयारी सुरू

भारतालाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, तैवान यासारख्या अनेक देशांशी कुरापती काढणाऱ्या चीनला आता जागतिक पातळीवर घेरण्याची तयारी सुरू आहे. चीनमधील मानवाधिकाराच्या गळचेपीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात मानवाधिकाराचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केले जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतालाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, तैवान यासारख्या अनेक देशांशी कुरापती काढणाऱ्या चीनला आता जागतिक पातळीवर घेरण्याची तयारी सुरू आहे. चीनमधील मानवाधिकाराच्या गळचेपीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात मानवाधिकाराचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केले जाणार आहे.

अमेरिका, ब्रिटनच्या आवाहनावर या मुद्यावर अनौपचारिक चचार्देखील झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जपानसह आशियान गटातील महत्त्वाच्या देशांची अमेरिकेला साथ मिळणार आहे. युरोपमधील अनेक देश चीनविरोधात भूमिका घेण्यास तयार आहेत. 

ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका-चीन यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेऊन लष्करावरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन लष्कर, नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश करण्यात येणार आहे. भारतासोबत चीनचा वाद सुरूच असून चीनचा जपानसोबत सेनकाकू बेटाच्या मुद्यावर तणाव वाढला आहे. तर, दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीनची धडपड सुरू असल्यामुळे अन्य देशांसोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. 

चीनने तैवानला धमकी दिल्यानंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे. हॉंगकॉंगमध्ये चीनने येथील जनतेचे लोकशाही हक्क काढून घेतले आहेत. त्यामुळे येथील जनता संतप्त आहे. इंग्लंडशी झालेल्या करारानुसार हॉंगकॉंगमधील लोकशाही व्यवस्था कायम ठेवण्याचे आश्वासन चीनने दिले होते. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा कायदा करून आता चीन हॉंगकॉंगमधील जनतेवर हुकुमशाही वरवंटा फिरविण्याची तयारी सुरू केली आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाहीचा गळा यामुळे घोटला जाणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*