महसुल मंत्र्यांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन जनतेला केले जात आहे. मात्र शहरात महसुलमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम ढाब्यावर बसवण्यात आला.

कोरोनाच्याकाळात खूप महत्वाचे काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा असे आवाहन शासनासह प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार केले जात आहे. याबाबतच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांद्वारे करोडो रूपये खर्च केले त आहेत.

विविध राजकीय पक्षांसह सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसह प्रशासनदेखील डिजिटल यंत्रणेचा वापर करून बैठका घेतआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील डिजिटल यंत्रणेद्वारेच देशातील मुख्यमंत्र्यांशी संवादसादतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही ऑनलाइन पध्दतीचाच मोठ्या प्रमाणात वापर करतात. असे असतांना कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठका घेतल्या.

या बैठकांमध्ये शासकीय नियमांना तिलांजली दिली. बैठकीत उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले नाही. अनेकांनी मास्कदेखील लावलेले नसल्याने खुद्द मंत्री,पदाधिकाऱ्यांमध्येच भीती व्यक्त केली जात होती. या प्रकारची नाशिकमध्ये दिवसभर चर्चा होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*