मराठा स्ट्रॉंगमॅनच्या मुलीला सीकेपी असल्याचा अभिमान, सुप्रिया सुळेंवर टीकेचा भडिमार

राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नेहमीच मराठ्यांचा पक्ष म्हणून टीका होते. शरद पवार यांना दिल्लीमध्ये मराठा स्ट्रॉँगमॅन म्हणून ओळखतात. पण याच मराठा स्ट्रॉँगमॅनच्या मुलीला सीकेपी असल्याचा अभिमान आहे. एक ट्वीट केल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नेहमीच मराठ्यांचा पक्ष म्हणून टीका होते. शरद पवार यांना दिल्लीमध्ये मराठा स्ट्रॉँगमॅन म्हणून ओळखतात. पण याच मराठा स्ट्रॉँगमॅनच्या मुलीला सीकेपी असल्याचा अभिमान आहे. एक ट्विट केल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी My CKP Moment – Patankar, Sardesai, Thackeray – Sule म्हणून एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई दिसत आहेत. या ट्वीटनंतर सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. त्यावरून सर्वात पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांची जात कोणती? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर एका ट्वीटमध्ये उत्तरही दिले गेले आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे सीकेपी असून ठाकरे कुटुंबाचे नातेवाईक असल्याचे म्हटले आहे.

मात्र, बहुतांश जणांनी ‘फुरोगामी’ म्हणून त्यांची टर उडविली आहे. एकाने म्हटले आहे की, एक तरुण नेतृत्व म्हणून आपल्याकडून यापेक्षा चांगल्या अपेक्षा आहेत. आपण अमानवी जातीव्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तिचं उदात्तीकरण करण्यासाठी नाही. राष्ट्रवादीच्याच एकाने त्यांना शरद पवार यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला आहे.

‘अतिशय टाकाऊ ट्वीट. आपल्या जातीचा उल्लेख अभिमानाने करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. जातीअंत काय फक्त सभेत भाषणं देण्यापुरता बोलायचा का? आपल्या वडिलांनी ‘मी मराठा आहे’ असा उल्लेख कधी केला नाही. निदान त्यांचा तरी आदर्श घ्यावा असे वाटते. चूक लक्षात येईल ही अपेक्षा, असेही म्हटले गेले आहे.

राजकारणातील नेपोटिझम (नातेवाईकशाही) असे म्हणा मॅडम, तुम्हाला जातीच्या पुढे काय येत? असे एकाने म्हटले आहे. तर फालतू, जातीचा उल्लेख केला नाहीतर घशाखाली घास जाणार नाही. उद्या पवार कुटुंबासोबत फोटो काढून ‘माय मराठा मोमेंट’ असे पण टाका, अशी टीकाही होत आहे.

राष्ट्रवादीच्या तथाकथित पुरोगामी व फुले शाहू आंबेडकर विचार मानणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी यावर तोंड उघडून दाखवावे, असे आव्हान एकाने दिले आहे. तुम्ही भांडत बसा मराठा-बामन-दलित करत असा सल्ला एकाने दिला आहे. शाहू,फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र फक्त आमच्या भाषणात असतो, अशी टिपणीही एकाने केली आहे.

मित्रानो यांचे जातीयवादी – पुरोगामीपणा आम्ही आंबेडकरी दर लोकसभेला पाहतच असतो…भिकारचोट जातीयवादी, असा संताप एकाने व्यक्त केला आहे. ब्राह्मणेतर चळचळीतील मराठेतर गटबाजी अशी टीकाही केली आहे. पुरोगामी महाराष्ट्र जातीअंत, पुरोगामी आणि मानवजात ह्या विचारातून तयार झालेली राष्ट्रवादी व पवार साहेबांच्या बहुजन समाजाला पुढे नेण्याचा काम बघून माझ्यासारखे लाखो तरुण पवार साहेबांच्या मागे आहे स्वत:च्या जातीचा कधी उल्लेख केला नाही.

तुमच्या या संकुचित वृत्तीमुळे बहुजन नेत्यांचे नुकसान करू नका, अशी विनवणीही एकाने केली आहे. अशी ‘मोमेंट’ फडणवीसांनी टाकली असतीतर मिडीयाला किती खाद्य मिळाले असते. आल्या ताई जातीवर, असा सवालही एकाने केला आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*