भुजबळांच्या नावाने खंडणी वसूलणारे पकडले; पण त्यांचे बोलवते धनी कोण?; धुळेकरांना आला संशय


विशेष प्रतिनिधी

नाशिक : घोटाळे, गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकलेले आणि चौकशीही सुरू असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने आता धुळ्यातील शिरपूर भागात खंडणी वसुली सुरू झाली आहे.

आम्ही छगन भुजबळ यांच्या आदेशाने आलो आहेत. तुमच्या दुकानाबाबत खूप तक्रारी आहेत, असा दम देऊन स्वस्त धान्य दुकानदारांकडून दोन लाख रूपयांची खंडणी वसुली करण्यात आली. या प्रकरणी तीन भामट्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला असला तरी यामागचा बोलविता धनी कोण याचा तपास पोलिस करीत आहेत.

शिरपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय सोनवणे यांच्या दुकानांसमोर सोमवारी दुपारी काळ्या रंगाची मारूती स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. त्यातून दोन महिला व एक पुरुष उतरले. रूबाबदार पोशाख केलेल्या तिघांसोबत शिंगणे येथील रहिवासी हे सर्वजण सोनवणे यांच्याकडे गेले आम्ही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने दुकान तपासणीसाठी आलो आहोत.

काही वेळ दुकानाचे दप्तर चाळल्यानंतर त्यांनी तुमच्या दुकानात अफरा तफर झाली आहे. तुम्ही गोरगरीबांना धान्य वाटत नाही. प्रकरण मिटवायचे असेल तर दोन लाख रूपये द्यावे लागतील, असा दम दिला.

एव्हाना त्यांच्या हालचालींवरून दुकानदाराला संशय आला होता त्यामुळे त्याने थेट तहसीलदार आबा महाजन यांना फोन करून घडल्याप्रकरणी माहिती दिली. तहसीलदारांनी तसे कोणतेही पथक आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर दुकानदारांनी शेजारच्या दुकानदारांना हाका मारल्या. त्यामुळे गर्दी जमू लागल्याने संशयितांनी लगेचच पळ काढला पण यातील काहींना पकडण्यात यश आले आहे.

त्यातून आता तपास सुरु असला तरी स्वस्त धान्य दुकानदारांकडून वसुलीचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात असे प्रकार घडले आहे. त्यामुळे ही खंडणी वसुली पुन्हा जोरात सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था