भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच १०० टक्के वेळ पाळत आपले लक्ष्य साध्य केले आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. म्हणजेच, १ जुलै रोजी कोणतीही रेल्वे उशिरा धावली नाही किंवा उशिरा पोहोचली नाही. रेल्वे सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा अगदी अचूक होत्या.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच १०० टक्के वेळ पाळत आपले लक्ष्य साध्य केले आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. म्हणजेच, १ जुलै रोजी कोणतीही रेल्वे उशिरा धावली नाही किंवा उशिरा पोहोचली नाही. रेल्वे सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या निर्धारीत वेळा अचुकरित्या पाळल्या गेल्या.
भारतीय रेल्वेच्या वेळांबाबत अनेक विनोद प्रचलित आहेत. रेल्वे कधीही वेळेवर येत नाही, असे म्हटले जाते. परंतु, १ जुलै रोजी एकही रेल्वे उशिराने धावली नाही. नेहमी धावणाऱ्या रेल्वेंच्या तुलनेत सध्या प्रमाण कमी आहे. त्यामुळे रेल्वे रुळांवर गर्दी कमी होती. तरीही रेल्वेने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावर आनंद व्यक्त करत ट्वीट केले की, ट्रेन्स फास्ट लेनमध्ये चालत आहेत. सेवेमध्ये सुधारणा आली आहे. चीनी व्हायरस संकटामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये रेल्वेने लोकांना घरापर्यंत पोहचवण्यात मदत केली. व्हायरसमुळे रेग्युलर ट्रेन सर्विस 12 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. परंतू, 230 मेल आणि स्पेशल एक्सप्रेस ट्रेन्स सुरू आहेत.
रेल्वेची सेवा बंदी असली तरी मालवाहतुकीचे काम सुरू आहे. देशातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना रेल्वेचा मोठा आधार झाला आहे. रेल्वे मंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कामासाठी उत्साहित केले आहे. त्यामुळे रेल्वेचे कर्मचारीही योद्ध्याप्रमाणे काम करत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.