भारतीय जवानांची मानवता, गोळीबाराच्या फैरीत अडीच वर्षांच्या बालकाला वाचविले

अतिरेक्यांकडून बेछुट गोळीबार होतोय, आपले तीन सहकारी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याने त्यांनाही वाचवायचे होते. पण यावेळी अडीच वर्षांच्या बालकाला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सीआरपीएफच्या जवानांनी वाचविले. भारतीय जवानांनी अतुलनिय धैर्यासोबत मानवतेचाही आदर्श घालून दिला.


वृत्तसंस्था

श्रीनगर : अतिरेक्यांकडून बेछुट गोळीबार होतोय…आपले तीन सहकारी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याने त्यांनाही वाचवायचे होते. पण यावेळी अडीच वर्षांच्या बालकाला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सीआरपीएफच्या जवानांनी वाचविले. भारतीय जवानांनी अतुलनिय धैर्यासोबत मानवतेचाही आदर्श घालून दिला.

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे हा प्रकार घडला. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या गोळीबारात एक वयोवृद्ध व्यक्ती मृत्यूमुखी पडला. त्याच्याबरोबर अडीच वर्षांचा नातू होता.

हे अबोध बालक आपल्या मृत आजोबांच्या छातीवर होते. हे पाहून सीआरपीएफच्या जवानांनी त्याला वाचविले. हा मुलगा गोळीबारादरम्यान आजोबाच्या मृतदेहाजवळ रडत बसला होता. सुरक्षा दलाच्या एका जवानाने त्याला तेथून सुखरूप बाहेर काढले. व जेव्हा सर्वत्र गोळीबार चालला होता तेव्हा या मुलाला वाचविणे खूप आव्हानात्मक होते.

सुरक्षा दलाच्या एका जवानाने सांगितले की, आमचे तीन सैनिक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आम्हाला त्यांना वाचवायचे होते. तेव्हा एका नागरिकाला देखील तेथून बाहेर काढायचे होते. तो देखील जखमी होता. आम्हाला सर्वाधिक विचलित करणारे दृष्य तेव्हा होते जेव्हा आम्ही एक अडीच-तीन वर्षाच्या मुलास तिथे रडत फिरताना पाहिले. त्यावेळी समोरच्या बाजूने गोळीबार होत होता. अतिरेकी मशीदीच्या वरच्या मजल्यावरून गोळीबार करत होते.

आमच्यासमोर पहिलं आव्हान म्हणजे दहशतवाद्यांची नजर तेथून हटवणे होते. जेणेकरून तिथून मुलाला काढता येईल. यानंतर आम्ही सर्व वाहने तेथे लावली आणि त्याचा आडोसा घेऊन या बालकाला वाचविले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*