भारताचे चीनला चोख उत्तर, दक्षिण चीन समुद्रात तैनात केली युध्दनौका

सीमेवर भारताच्या सातत्याने कुरापती काढणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने दक्षिण चीन समुद्रांत आपली युध्दनौका तैनात केली आहे. चीनच्या कुठल्याही कृतींवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने घेतलेला हा आक्रमक पवित्रा मानला जात आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीमेवर भारताच्या सातत्याने कुरापती काढणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने दक्षिण चीन समुद्रांत आपली युध्दनौका तैनात केली आहे. चीनच्या कुठल्याही कृतींवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने घेतलेला हा आक्रमक पवित्रा मानला जात आहे.

चीनसोबत लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेल्या वादानंतर अद्यापही तणावाचे वातावरण आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनने २००९ पासून कृत्रीम बेटं निर्माण करीत आणि समुद्रात आपलं सैन्य तैनात करीत कार्यक्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्यामुळे चीनचे शेजारील देशांशी वाद निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर चीनच्या या कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने नुकतेच दक्षिण चीन समुद्रात आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता भारतानेही आपली युद्धनौका या भागात तैनात केली आहे. जूनमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत निर्माण झालेल्या वादामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते.

त्यानंतर चीनवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय नौदलानं आपली युद्धनौका दक्षिण चीनच्या समुद्रात पाठवली. यावर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलानं आक्षेप घेतला आहे. या समुद्रातील सर्वाधिक भाग हा आमच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा चीनकडून केला जात असून अन्य देशांच्या जहाजांना आणि विमानांना या क्षेत्रात येण्यापासून रोखत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*