बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चिन्यांच्या दहशतीपासून गालवन भाग मुक्त केला; १८ चिनी सैनिकांना माना पिरगळून मारले


  • कर्नल सुरेश बाबू यांच्या बलिदानाचा घेतला सूड
  • भारतीय सैन्याच्या घातक पथकाचाही पराक्रम

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत – चीन हिंसक संघर्षाच्या युद्धस्य कथा रम्य: बाहेर यायला लागल्या असून बिहार रेजिमेंटच्या शूर जवानांनी कर्नल सुरेश बाबू यांच्या बलिदानाचा सूड घेताना १८ चिन्यांना माना पिरगळून मारल्याची कहाणी विविध सूत्रांकडून समजत आहे.

सुरेश बाबू यांना चिनी सैनिकांनी मारल्याचे समजताच बिहार रेजिमेंटच्या खवळलेल्या जवानांनी १८ चिनी सैनिकांच्या माना पिरगळून त्यांना मारले. हिंसक संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. भारतीय जवानांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाई चिनी सैनिक पळत सुटले. जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यावर बिहार रेजिमेंटच्या वीर जवानांमध्ये तुफान संचारले आणि ते चिन्यांवर तुटून पडले.

भारतीय जवानांचा रौद्र अवतार पाहून चिन्यांची बोबडीच वळली ते पळून जात होते. पण तोवर १८ चिनी सैनिकांच्या मानेची हाडे तुटून मुंडकी लोंबकाळत होती, कमांडर हुतात्मा झाल्याचा जवानांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. समोर येणाऱ्या चिनी सैनिकांचे त्यांनी असे हाल केले की त्यांना ओळखणेही कठीण झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१ जवान आणि ५ चिनी सैनिक, तरीही धडा शिकवला

बिहार रेजिमेंटच्या जवानांनी त्या रात्री चिन्यांना असा धडा शिकवला की त्यांच्या शौर्याची गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल. त्या रात्री चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांच्या तुलनेत चौपटीने अधिक होती. चिनी सैनिकांनी कट रचून हा हल्ला केला त्यावेळी भारतीय जवानांची कुठलीही तयारी नव्हती. कारण चिनी असा धोका देतील असे त्यांना वाटले नाही. तरीही जवानांनी चिन्यांना असा धडा शिकवला की चीन सरकार यावर बोलायलाही तयार नाहीए. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी बांधलेले तंबू हटवण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार कर्नल बी. संतोष बाबू हे घटनास्थळी पोहोचले. चिनी सैनिकांना त्यांनी तंबू हटवण्यास सांगितले. चिन्यांनी झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला.

घातक पथक मदतीला धावले

हिंसक संघर्षात बी. संतोष बाबू हुतात्मा झाल्यानंतर बिहार रेजिमेंटच्या जवानांचा संयम सुटला. त्यांनी जवळ असलेल्या सैन्याच्या च्या दुसऱ्या तुकडीला याची माहिती दिली आणि मदत मागितली. माहिती मिळताच सैन्याचे ‘घातक पथक’ तिथे दाखल झाले. बिहार रेजिमेंटचे जवान आणि घातक पथकातील जवानांची संख्या मिळून फक्त ६० होती. दुसरीकडे चिनी मोठ्या संख्येत होती. चार तास भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक धुमश्चक्री सुरू होती. चिन्यांकडे तलवारी आणि लोखंडी रॉड होते. भारतीय जवानांनी ती हिसकावून त्यांच्यावरच वार करण्यास सुरुवात केली. बिहार रेजिमेंटच्या जवानांचा रौद्र रूप पाहून शेकडोंच्या संख्येत असलेले चिनी सैनिक पळू लागले आणि खोऱ्यात लपून बसले. तरीही भारतीय जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. चिन्यांच्या दहशतीतून गालवन भाग मुक्त केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती